आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती पत्नी और वो... जाणून घ्या अशा सेलिब्रिटींविषयी ज्यांच्यावर बसला 'होम ब्रेकर'चा ठपका!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्म इंडस्ट्रीत सेलिब्रिटींचे विवाहबाह्य संबंध असणे नवीन गोष्ट नाहीये. कुणाचे कधी कुणावर प्रेम जडेल आणि कुणाचा संसार उद्धवस्त होईल, हे सांगता येत नाही.
सध्या अनुराग कश्यप आणि कल्कि कोचलिन विभक्त झाल्याची बातमी चर्चेत आहे. अद्याप दोघांचा घटस्फोट झालेला नाही, मात्र नात्यात आलेल्या दुराव्यामुळे दोघेही वेगवेगळे राहात आहेत. हुमा कुरैशीमुळे दोघांचा संसार पणाला लागल्याची चर्चा बॉलिवू़मध्ये आहे. उल्लेखनीय म्हणजे अनुराग कश्यपनेच हुमाला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला होता. अनुराग कश्यप दिग्दर्शित 'गँग्स ऑफ वासेपूर' या सिनेमात हुमाला पहिला ब्रेक मिळाला होता. त्यानंतर हे दोघे चांगले मित्र झाले. आता खरंच कल्कि आणि अनुरागच्या नात्यात दुरावा निर्माण करायला हुमा कारणीभूत ठरली आहे का? हे तर आम्हाला ठाऊक नाही. मात्र बॉलिवूडमध्ये सध्या या चर्चेला उधाण आले आहे.
असो, तसं पाहता बॉलिवूडमध्ये 'पती-पत्नी और वो' असल्याचे हे काही पहिले उदाहरण नाहीये. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी विवाहित पुरुषांसोबत नातं निर्माण करुन त्यांचा संसार उद्धवस्त करुन स्वतःचा संसार थाटला आहे. तर काहींनी पुढे टाकलेले पाऊल मागे घेतले. अशा सेलिब्रिटींना होम ब्रेकर म्हणणं वावगं ठरणार नाही.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशा काही प्रसिद्ध सेलिब्रिटींविषयी ज्यांनी कुणाचीही पर्वा न करता विवाहित पुरुषासोबत स्वतःचा संसार थाटला...