आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीसिंहने कुटुंबीयांसोबत दुबईमध्ये साजरा केला वाढदिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 मार्चला यो यो हनीसिंहने त्याचा 31वा वाढदिवस साजर केला. त्याने मुंबईमध्ये वाढदिवस साजरा न करता दुबईमध्ये साजरा केला. कारण तिथे त्याचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. हनी म्हणाला, की गेल्या काही दिवसांपासून कामातून वेळ मिळत नव्हता परंतु आज मी पार्टी करण्यासाठी वेळ काढला आहे. सध्याच्या त्याच्या आयुष्याविषयी हनी म्हणतो, की सर्वकाही स्वप्न असल्याचा भास होत आहे. त्याला गरजू आणि सुखापासून वंचित मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे.
तो पुढे म्हणाला, 'मी जेव्हा उपाशी मुलांना पाहतो तेव्हा माझे मन दुखी होते. मला भारतात या मुलांसाठी काम करण्याची इच्छा आहे. गरजू मुले उपाशी राहिले तर मी गाणी गाऊन कसा आनंदी राहू शकतो.'
बॉलिवूडमध्ये स्टारडम मिळाल्यानंतर हनीसिंहचे हे पहिले बर्थडे सेलिब्रेशन होते. यापूर्वी त्याची पंजाबी गाणी भारतापूरतेच मर्यादीत होते.