आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Aamir Khan Painted His Body For Dhoom 3 Song Malang

5 कोटींच्या 'मलंग'साठी आमिरने घेतली BODY ARTची मदत, पेंट करायला लागायचे दररोज 3 तास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवू़डचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच आमिर खान आपल्या सिनेमा यश मिळवून देण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाही. आता त्याचा आगामी 'धूम 3' या सिनेमाचेच उदाहरण घ्या ना. हा सिनेमा आमिरचा यावर्षीचा पहिला आणि शेवटचा सिनेमा आहे. त्याचे चाहते या सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट बघत आहेत. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर येत्या 20 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
या सिनेमातील 'मलंग...' हे गाणे सध्या बरेच चर्चेत आहे. या गाण्यावर तब्बल 5 कोटींचा निर्मिती खर्च करण्यात आला आहे. शिवाय या एका गाण्यासाठी आमिरने बराच घाम गाळला आहे.
या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यात कतरिनाने एक झगमगता बॉडीसूट परिधान केला आहे. तर आमिरने या गाण्यासाठी आपली बॉडी पेंट करुन घेतली आहे. टॅटूसारख्या दिसणा-या या खास मेकअपसाठी आमिर खानला दररोज रोज तीन तास लागायचे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला आमिर खानची मेकअप करतानाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा आमिर खानची ही खास छायाचित्रे....