आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'DAY SPL: 22 वर्षे मोठे असलेल्या दिलीप कुमारबरोबर कसे झाले होते सायराचे लग्न, जाणून घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानोचा आज (23 ऑगस्ट) 68 वा वाढदिवस आहे. सायरा बानो 1966 साली दिलीप कुमार यांच्याबरोबर विवाहबद्ध झाली होती. ज्यावेळी दिलीप कुमार यांच्याबरोबर सायरा बानोचे लग्न झाले तेव्हा ती 22 तर दिलीप साहेब 44 वर्षांचे होते.

त्याकाळात सगळेच दिलीप कुमार यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत होते. कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळे दिलीप कुमार यांनी वयाच्या 44व्या वर्षी लग्न केले होते. मात्र दिलीप-सायरा यांच्या लग्नाची बातमी सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारी होती. त्याचे कारण होते त्यांच्या वयातील 22 वर्षांचे अंतर.

आज ही जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक असून दिवसेंदिवस या दोघांमधील प्रेम वृद्धिंगत होत गेले. आजही हे दोघे एकमेकांचा हात हातात घेऊन आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या लग्नाची ही कहाणी...