आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या बहिणींनी दिले नाही कॅटला महत्त्व, गणेश विसर्जनाच्या वेळी केले IGNORE!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत मंगळवारी सलमान खानच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. या विसर्जनामध्ये बॉलिवूडमधील बरीच मंडळी सहभागी झाली होती. सोनाक्षी सिन्हा, संगीता बिजलानी, मलायका अरोरा खान येथे दिसल्या. मात्र कतरिना कैफला बघून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

तसे पाहता सलमानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतरसुद्धा कतरिना त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होती. मात्र रणबीर कपूरबरोबरच्या वाढत्या जवळीकमुळे सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिच्याकडे पाठ फिरवली होती. कतरिना पुन्हा एकदा सलमानच्या कुटुंबीयांमध्ये सामील होईल, असा विचारही कुणी केला नव्हता. मात्र मंगळवारी कतरिना सलमान खानच्या घरी पार पडलेल्या कार्यक्रमात सहभागी झाली आणि तिला बघून उपस्थित दंग झाले. कतरिना तिची मॅनेजर रेशमा शेट्टीबरोबर येथे आली होती.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कतरिना पेंडॉलमध्ये दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम सलमानची आई सलमा यांना भेटायला गेली. यावेळी ती इतर कुणांबरोबर बोलताना दिसली नाही. ती केवळ सलमा खान यांच्याबरोबरच दिसली. एकेकाळी सलमानच्या बहिणी अर्पिता आणि अलविरा तिच्या खूप जवळच्या होत्या. मात्र यावेळी दोघींनीही तिच्याकडे दुर्लक्ष केलं.

आतील गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, कतरिनाने सलमानला दगा देऊन रणबीरशी जवळीक साधल्यामुळे त्याच्या दोन्ही बहिणी तिच्यावर रागावल्या आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा सलमानच्या गणपती विसर्जनाला आलेल्या कतरिना आणि काही इतर सेलिब्रिटींची ही खास छायाचित्रे...