आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • How To Matain Beuty During Pregancy? Learn From Karishma

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गरोदरपणही ग्लॅमरस कसे ? करिष्‍माकडून शिका !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - करिना कपूरची थोरली बहीण आणि 90 च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री करिश्मा आता लेखिका झाली आहे. गरोदरपणा व मातृत्वानंतरही ग्लॅमरस कसे राहावे, बाळाचे संगोपन कसे करावे याविषयी तिने काही खास टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत. पुस्तक या महिन्यातच प्रकाशित होत आहे.

‘माय यमी ममी गाइड : फ्रॉम गेटिंग प्रेग्नंट टू लुजिंग ऑल द वेट अँड बियाँड’ असे लांबलचक नाव करिश्माने आपल्या पुस्तकाला दिले आहे. पेंग्विन प्रकाशन संस्थेच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे. प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या पुस्तकांचे कव्हर जसे असते त्याच धर्तीवर याचेही कव्हर आहे. करिश्माची धाकटी बहीण करिना हिनेही गतवर्षी फॅशन आणि ग्लॅमरवर पुस्तक लिहिले आहे. मातृत्वाबद्दल आटोपशीर, मुद्देसूद माहिती असलेले हे पुस्तक आहे. आरोग्य, फिटनेस, सुंदरता आणि फॅशनपासून ते नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी, बाळंतपणात व नंतर कामाचे नियोजन कसे करावे, मुलांचा सांभाळ करणार्‍या दाई यांच्याकडून कसे काम करून घ्यावे याच्या टिप्स आणि क्लृप्त्या करिश्माने ओघवत्या शैलीत दिल्या आहेत, असे प्रकाशकाने सांगितले.