आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik And Katrina In Shimla For Shooting Of Bang Bang

'बँग बँग'च्या शुटिंगसाठी कतरिना-हृतिक शिमल्यात, पाहा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कतरिना कैफ सध्या त्यांच्या 'बँग बँग' या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. सिध्दार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनवल्या जाणा-या या सिनेमाची शुटिंग शिमलामध्ये केली जात आहे. यासाठी दोन्ही कलाकार शुटिंगसाठी शिमल्याला गेले आहेत.
'बँग बँग' सिनेमाची शुटिंग रविवारी काही प्रमाणात स्कँडल पॉइंटवर करण्यात आली. त्यावेळी कॅट आणि हृतिकचा एका शॉट होता त्यामध्ये अचानक एक तरूण कॅटसोबत वाद घालायला लागतो आणि हृतिक त्याला गोळी घालून ठार करतो.
काल (8 फेब्रुवारी) कॅट मरीना हॉटेलमध्ये थांबलेली होती. ती शुक्रवारी शिमल्याला पोहोचली होती. परंतु वातावरण ठिक नसल्याने त्यांनी कॅटची शुटिंग थांबवली होती. परंतु त्यावेळी हृतिकची शुटिंग चालू होती. तो दिवसभर माल रोडवर शुटिंगमध्ये व्यस्त होता.
पुढील स्लाइड्यवर क्लिक करा आणि बघा शुटिंगचे काही सीन्स...