आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 'कांची'च्या म्यूझिक लाँचिंगला हृतिक रोशनसह अनेक स्टार्सची उपस्थिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुभाष घई दिग्दर्शित आणि 2014च्या सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या सिनेमांमधील 'कांची' हा एक सिनेमा आहे. 'कांची'चे 18 मार्च रोजी मुंबई येथे म्यूझिक लाँच करण्यात आले. सिनेमाच्या म्यूझिक लाँच कार्यक्रमामध्ये अनेक स्टार्सनी उपस्थिती लावली. यानिमित्तावर अभिनेता हृतिक रोशनसुध्दा दिसला.
कोण-कोणत्या सेलेब्सनी लावली हजेरी?
हृतिक रोशनव्यतिरिक्त जॅकी श्रॉफ, धर्मेंद्र, संगीत दिग्दर्शक सलीम-सुलेमान, इस्माइल दरबार, सिनेमाची मुख्य अभिनेत्री मिष्टी, अभिनेता कार्तिक तिवारी, दिग्दर्शक सुभाष घई, निर्माता रमेश तौरानीसह काही स्टार्स दिसले.
यावेळी जॅकी श्रॉफने दिग्दर्शक सुभाष घईसोबत डान्सदेखील केला. हृतिक कार्यक्रमात खूपच कूल अंदाजात दिसत होता. तसेच सिनेमाचे मुख्य कलाकार मिष्टी आणि कार्तिकसुध्दा आकर्षक अंदाजात दिसत होते. सर्व स्टार्सनी यावेळी विविध पोझ कॅमे-यात कैद केल्या. सुभाष घई यांनी सिनेमाविषयीच्या काही रंजक गोष्टी शेअर केल्या. सोबतच, सलीलने त्याच्या गायनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कसा आहे 'कांची'?
'कांची' हा एक सत्तेच्या विरोधात लढा देणा-या एका सामान्य तरूणीची कहाणी आहे. हा सिनेमा सुभाष घई यांनी दिग्दर्शित केला असून त्यांनीच निर्मितदेखील केला आहे. सुभाष घई यांनी 'कालीचरण' (1976), 'विश्वात्मा', (1978), 'कर्ज' (1980), 'हीरो' (1983), 'कर्मा' (1986), 'राम लखन' (1989), आणि 'खलनायक' (1993)सारखे अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत.
'कांची' सिनेमाचे दिग्दर्शनापूर्वी सुभाष घई यांनी 2008मध्ये प्रदर्शित झालेल्या 'युवराज' या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. घई यांच्या या सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते.
'कांची'मध्ये कोण-कोणते कलाकार आहेत?
'कांची'मध्ये कार्तिक तिवारी आणि नवोदित अभिनेत्री मिष्टी घोष मुख्य भूमिकेत आहे. या दोन्ही स्‍टार्सव्यतिरिक्त ऋषि कपूर आणि मिथुन चक्रवतीसुध्दा सिनेमाच्या महत्वपूर्ण भूमिकेत आहे. घई यांच्या या सिनेमा मिष्टी ही त्यांनी नवीन शओधलेली अभिनेत्री आहे. मिष्टीपूर्वी त्यांनी बॉलिवूडला मनिषा कोयराला आणि महिमा चौधरीसारख्या अभिनेत्री दिल्या आहेत.
'कांची'चे संगीत इस्माइल दरबार आणि सलील-सुलेमान यांनी दिले आहे. सुभाष घई याचा हा सिनेमा 25 एप्रिलला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'कांची'च्या म्यूझिक लाँचला आलेल्या स्टार्सची काही खास छायाचित्रे...