मुंबई - बॉलिवूड अभिनेचा ऋतिक रोशनच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ऋतिकने लॉस एंजिलिसहून एका निवेदनाद्वारे पत्नी सुझानसोबत घटस्फोट घेणार असल्याचे उघड केले. या बातमीमुळे बॉलिवूडकरांसोबतच सामान्यांनाही धक्का पोहोचला होता.
ऋतिक आणि सुझानचे सतरा वर्षे जुने नाते संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. ऋतिकने आपल्या निवेदनात म्हटले होते, की सुझान त्याच्यापासून विभक्त होऊ इच्छिते.
घटस्फोटाची गोष्ट जाहिर केल्यानंतर आठवड्याभराने ऋतिक अमेरिकेहून भारतात परतला. 20 डिसेंबर रोजी तो मुंबई विमानतळावरुन बाहेर पडताना दिसला.
सुझान आणि ऋतिक त्यांच्यातील तणावाचा परिणाम मुलांवर पडू देऊ इच्छित नाहीत. म्हणूनच मुले रिहान आणि रिधान यांच्या शाळेतील अँन्युअल फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी ऋतिक परदेशातून भारतात परतला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त..