बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझानच्या वैवाहिक आयुष्याचा काडीमोड झाला आहे. मागील काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या मीडियात सतत येत होत्या. मात्र त्या बातम्या अफवा असल्याचे म्हटले गेले होते. पण शुक्रवारी संध्याकाळी स्वतः ऋतिकने मीडियासमोर येऊन घटस्फोटाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे.
ऋतिकनं एका निवेदनातून आपल्या घटस्फोटाविषयी स्वत:हून माहिती दिली आहे. तो म्हणतो, “सुझाननं स्वत:च वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आमचे मागील 17 वर्षांपासूनचे संबंध संपुष्टात आले आहेत. माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी हा काळ अतिशय कठीण आहे. त्यामुळं आमचं खाजगी जीवन खाजगी राहू द्या” अशी विनंती ऋतिकनं केली आहे.
“मी माझ्या फॅन्सला निराश करु इच्छित नाही, कारण त्यांचा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. माझा सुद्धा लग्नसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी पुन्हा एकदा माझ्या चाहत्यांना धन्यवाद देऊ इच्छितो, की त्यांनी मला प्रेम दिलं आणि माझ्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना केली.” असंही ऋतिक म्हणाला.
सुझानने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचे 17 वर्षे जुने नाते संपुष्टात येणार आहे.
ऋतिकने केलेल्या या घोषणेनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. इंडस्ट्रीतील लोक ऋतिक आणि सुझानचे नाते तुटल्यामुळे काळजीत पडले आहेत. याप्रकरणी काही सेलिब्रिटींनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या याविषयी काय बोलले सेलिब्रिटी...