आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan Contributes Rs 25 Lakhs To Aamir Khan\'s Initiative

हृतिक रोशन डिस्चार्ज, आमीरच्या अभियानाला दिले २५ लाख!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याला आज (गुरुवार) हिंदूजा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्याच्या डोक्यात झालेल्या गाठीवर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर तो रुग्णालयातच आराम करणार असल्याचे वृत्त होते. परंतु, त्याला आता डिस्चार्ज दिला असल्याने तो घरी आराम करणार असल्याचे दिसून येते. दरम्यान, आमीर खानच्या अभियानाला हृतिक रोशनने २५ लाख रुपये दान देण्याचा निर्णय घेतला आहे.


उत्तराखंडमधील महापूर आणि भुस्खलन यातील पीडितांना मदत करण्यासाठी आमीर खानकडून

एक अभियान राबविले जात आहे. हृतिक रोशनला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला या अभियानाची माहिती मिळाली. त्याने या अभियानासाठी २५ लाख रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाला बॉलिवूडमधील सिलिब्रेटींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमीर खानने स्वतः २५ लाख रुपये देऊन या अभियानाला सुरवात केली आहे.

हृतिकच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेमुळे फॉक्‍स स्टुडियोच्या "बॅंग बॅंग' या चित्रपटाचे चित्रीकरण काहीसे लांबणीवर पडले आहे. मात्र त्याचा या चित्रपटावर काहीच परिणाम होणार नसल्याचे 'फॉक्‍स'च्या वतीने सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा