आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बँग-बँग'च्या शुटिंगसाठी शिमल्यात गेलेले कॅट-हृतिक फिरताहेत एकत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृतिक रोशन आणि कतरिना कैफ सध्या 'बँग बँग' सिनेमाच्या शुटिंगसाठी शिमल्यात आहेत. या दोन्ही स्टार्सना शुटिंगमधून थोडा मिळला तेव्हा ते हॉटेलच्या बाहेर फिरताना दिसले आहेत. दोघे जेव्हा हॉटेमध्ये गेले तेव्हा त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली.
'बँग बँग' या वर्षी 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. असे मानले जात आहे, की हा सिनेमा हॉलिवूडच्या 'नाइट अ‍ॅण्ड डे'चा रिमेक आहे. सिनेमाचे अनेक सीन्स ठंड ठिकाणी शुट करायचे होते म्हणून त्यांनी शिमला शहराची निवड केली. या सिनेमाचे दिग्दर्शन सिध्दार्थ आनंद करत आहे. या सिनेमात हृतिक, कतरिना व्यतिरिक्त डॅनी, जावेद जाफरी आणि बिपाशा बसूही असणार आहेत.
हृतिक आणि त्याची पत्नी सुझान काही दिवसांपूर्वी एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. त्यावेळी अशा बातम्या आल्या होत्या, की दोघांच्या दुराव्याचे कारण कॅट आहे. सोबतच, कतरिना आणि रणबीरमध्येही दुरावा निर्माण झाला आहे. कतरिना आणि हृतिकने यांनी 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमात एकत्र काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा शिमल्यात एकत्र फिरत आहेत हृतिक आणि कॅट...