आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

REVEALED : कॅट, बेबो आणि SRKनंतर आता ऋतिकसुद्धा झाला अंधश्रद्धाळू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकया जगात अंधश्रद्धाळू व्यक्ती कमी नाहीत. एखाद्याला कितीही प्रसिद्धी मिळाली तरीसुद्धा आस्था आणि अंधविश्वासावर व्यक्तीचा भर असतो. बी टाऊनचेही अनेक सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धाळू आहेत. सेलिब्रिटी अशी काही कामे करतात की त्यामुळे ते चर्चेत येतात. कधी हे सेलिब्रिटी भल्या पहाटे अनवाणी पायाने चालत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जातात, तर कधी लग्नापूर्वी चक्क एखाद्या झाडाबरोबरच लग्न करतात. यावरुन बॉलिवूड सेलिब्रिटी किती अंधश्रद्धाळू आहेत, हे स्पष्ट होतं.

कतरिना कैफ, विद्या बालन, करिना कपूर, शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन यांसह कितीतरी सेलिब्रिटी अंधश्रद्धाळू असल्याचे सांगितले जाते. आता या यादीत आणखी एका अभिनेत्याच्या नावाची भर पडली आहे, आणि तो अभिनेता म्हणजे ऋतिक रोशन.

ऋतिकचा आगामी 'क्रिश 3' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच ऋतिकच्या या सिनेमाचा पहिला ट्रेलर लाँच करण्यात आला. मात्र ज्योतिषांच्या नजरेत हा ट्रेलर योग्य नाहीये. त्यामुळे आता रोशन कुटुंबीयांनी नवीन ट्रेलर बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या अंधश्रद्धाळू सेलिब्रिटींविषयी...