आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिक रोशनने सोडला करणचा \'शुद्धी\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुभाष घईच्या 'यादे' सिनेमानंतर प्रेक्षकांना हृतिक रोशन आणि करीना कपूर या दोन प्रसिध्द स्टार्सना पुन्हा एकदा एकत्र बघण्याची इच्छा आहे. मात्र कदाचित ती पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसत नाहीये. सुरुवातीला बातम्या आल्या होत्या, की 'गोरी तेरे प्यार में' सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर करण जोहर पुन्हा एकदा करीना कपूरला आपल्या सिनेमात घेऊ इच्छित नाही. सांगितले जात होते, की 'शुद्धी' या सिनेमात करीना काम करणार नाही. परंतु आता याच्या विरूध्द घडले आहे.
हीरो हृतिक रोशननेच हा सिनेमा सोडला असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. न समजणारी गोष्ट अशी आहे, की दिग्दर्शक करण मल्होत्राच्या याच सिनेमासाठी हृतिकने शेखर कपूरचा 'पानी' सिनेमा सोडला होता. कारण त्यावेळी त्याला 'शुद्धी'साठी त्याचा वेळ द्यायचा होता.
हृतिक रोशनने सांगितले होते, 'करण मल्होत्रा आणि मी आता 'शुद्धी'साठी आम्ही खूप अपेक्षेने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून मी 'शुद्धी'सारख्या भव्य स्वप्नाला असे लटकून ठेऊ शकत नाही. एका अभिनेत्याच्या रुपात मला करणसोबत 'अग्निपथ'मध्ये काम करताना खूप चांगला अनुभव आला. मला माहित आहे, की दोन्ही करण (जोहर आणि मल्होत्रा) या सिनेमातून खूप प्रसिध्दीस येतील. 'शुद्धी' एक मोठा सिनेमा होऊ शकतो. माझ्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत.'