आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांचा सुपरहीरो ‘किड क्रिश’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक



क्रिश म्हणजेच ऋतिक रोशन मुलांचा आवडता हीरो बनला आहे. मुलांच्या मनात घर करणार्‍या भारताच्या पहिल्या सुपरहीरो क्रिशने मुलांसाठी आणखी एक सुपरहीरो ‘किड क्रिश’ चित्रपट आणला आहे. अलीकडचे या अँनिमेटेड टेलिफिल्मचा फस्ट लूक लाँच करण्यात आला. फिल्म क्रॉफ्टसोबत मिळून राकेश रोशनने हा अँनिमेटेड चित्रपट बनवला आहे. या वेळी ते म्हणाले की, पहिल्यांदाच एखाद्या बॉलिवूड पात्राचे अँनिमेटेड व्हर्जन येत आहे. चित्रपटाचे प्रीमियर दोन ऑक्टोबरला कार्टून नेटवर्कवर केले जाणार आहे. हृतिक म्हणाला, या अँनिमेटेड चित्रपटाची कथा मुलांना फार आवडेल. सध्याच्या कार्टून नेटवर्क ज्या प्रकारच्या चित्रपट किंवा काटरून दाखवले जातात, त्यापेक्षा हा चित्रपट कैकपट चांगला आहे. मुलांना नक्कीच आवडेल, अशी माझी अपेक्षा आहे. चित्रपटात क्रिश एक शास्त्रज्ञ आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा किड क्रिश टेलिफिल्मच्या लाँचवेळी क्लिक करण्यात आलेली राकेश आणि ऋतिक रोशनची ही खास छायाचित्रे...