आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan's Shuddhi To Be Shot In Rishikesh City

ऋषिकेशमध्ये होणार 'शुद्धी'चे शुटिंग, शंकराच्या भूमिकेत ऋतिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी 'शुद्धी' या सिनेमात अभिनेता ऋतिक रोशन झळकणार असल्याची बातमी दिव्यमराठी.कॉमच्या वाचकांना आम्ही आधीच दिली आहे.

आता या सिनेमासंदर्भातील एक नवीन बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. लवकरच या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. करण मल्होत्रा हा सिनेमा दिग्दर्शित करणार असून करण आणि त्याची पत्नी एकताने सिनेमासाठी लोकेशन रिसर्चचे काम पूर्ण केले आहे. अनेक धार्मिक शहरांमधून करण आणि एकताने ऋषिकेशची निवड सिनेमाच्या शुटिंगसाठी केली आहे. आता ऋषिकेशमध्ये लवकरच या सिनमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे.

या सिनेमात ऋतिकबरोबर अभिनेत्री करीना कपूर झळकणार आहे. करीना या सिनेमात पार्वतीच्या भूमिकेत दिसणार आहे.