आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Sussane Split Takes A Toll On Kids, Hrehaan And Hridaan Miss Dad Hrithik Roshan Terribly

हृतिक-सुझानच्या विभक्त होण्याचा परिणाम मुलांवर, वडिलांच्या प्रेमासाठी आसुसली मुले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृतिक रोशन आणि सुझान आपापसातील सामंजस्याने वेगळे झाले आहेत. परंतु यांच्या विभक्त होण्याचा परिणाम त्यांची दोन मुले रेहान आणि रिदानवर पडत आहे. त्यांची दोन्ही मुले सध्या आई सुझानजवळ राहत असल्याने त्यांना वडील हृतिकला भेटता येत नसल्याने दोघेही 'पापा' हृतिकची खूप आठवण काढतात. आमच्या जवळच्या सुत्रांच्या सांगण्यानुसार, 'हृतिकपासून वेगळी झाल्यानंतर सुझान मुलांसमवेत तिचे वडील संजय खान यांच्या घरी राहत असल्याने मुले 'पापा' हृतिकची खूप आठवण काढत आहेत.'
हृतिकच्या संबंधीत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दोन्ही मुले आई सुझानपेक्षा वडील हृतिकच्या जास्त जवळ होते. हृतिक नेहमी त्याच्या व्यवसायिक जीवनात मुलांसाठी वेळ काढत होता. परंतु सुझान नेहमीच तिच्या सामाजिक कार्यात व्यस्त होती म्हणून ती मुलांना वेळ देऊ शकत नव्हती. त्यावेळी हृतिकने नेहमीच तिला साथ दिली. हृतिक सतत मुलांच्या शिक्षण आणि अभ्यासाविषयी सतर्क असायचा. त्याने मुलांना फिक्स गिअरची एक सायकलही भेट दिली होती.'
सुत्रांनी सांगितले, 'रेहान आणि रिदान यांना 'पापा' हृतिकच्या आठवणींसोबत सध्या राहावे लागत आहे. हृतिक आणि रेहान-रिदानने ब-याच अविस्मरणीय क्षणांचा एकत्र आनंद घेतला आहे. त्यांना पुन्हा 'पापा' हृतिकसोबत राहण्याची इच्छा आहे परंतु आता सर्वकाही बदलले आहे.'
रोशन कुटुंबीयांमध्ये रेहान आणि रिदानचे कोण-कोण करत होते लाड, जाणून घ्या पुढील स्लाइड्सवर...