आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत चाललाय ऋतिक-सुझानमधील दुरावा, खास दिवशी राहणार नाही एकत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेते ऋतिक रोशनची पत्नी सुझान रोशन मुंबईत स्वत:चे लक्झरी बुटिक उघडणार आहे. मात्र त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ऋतिक दिसणार नाही. त्यामुळे सुझान नाराज झाली आहे. मात्र तो नक्कीच येईल, असा तिला विश्वास आहे.

बर्‍याच दिवसांपासून सुझान रोशन आणि ऋतिक रोशनमध्ये बेबनाव असल्याची चर्चा होती. शिवाय दोघांच्या घटस्फोटाची बातमीदेखील आली होती. यावर सुझानने आमच्यात असे काही घडले नसल्याचे म्हटले होते. याबरोबरच आपल्या ‘बांद्रा 190’ बुटिकच्या लाँचिंगवेळी पती ऋतिक प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार असल्याचेदेखील तिने सांगितले होते.

कार्यक्रमाची तारीख 11 डिसेंबर ठेवण्यात आली होती. मात्र आता योजना बदलली आहे. कारण या दिवशी ऋतिक येणार नसल्याची चर्चा आहे. यावर सुझानच्या मैत्रिणी (संजय कपूरची पत्नी महिप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खान) यांनी लाँचिंग पुढे ढकलण्याचे सांगितले आहे. मात्र ऋतिकने लाँचिंग ठरलेल्या तारखेवरच करण्याचे सांगितले आहे, कारण तो यायचे वचन देऊ शकत नाही.