आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिक रोशनच्‍या मेंदुवर शस्‍त्रक्रि‍या यशस्‍वी, डॉक्‍टर म्‍हणाले \'धोका टळला\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनवर रविवारी दुपारी हिंदुजा रुग्‍णालयात मेंदूची शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. ही एक एन्‍डोस्‍कोपी शस्‍त्रक्रिया आहे. त्‍याच्‍या मेंदुमध्‍ये रक्ताची गाठ तयार झाली आहे. ती शस्‍त्रक्रि‍येद्वारे काढण्‍यात येणार आली. सुमारे तासभर ही शस्‍त्रक्रिया चालली. शस्‍त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्‍याची पत्नी सुझान ऑपरेशन थिएटरच्‍या बाहेर उभी होती. हृतिक आता धोक्‍याबाहेर असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्‍याला आता 48 तासांसाठी रुग्‍णालयात रहावे लागणार आहे. त्‍यानंतर सुटी देण्‍यात येईल. घरी गेल्‍यानंतरही काही काळ त्‍याला पूर्णपणे विश्रांती घ्‍यावी लागणार आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हृतिकने आठवड्यापूर्वीच शस्‍त्रक्रि‍येचा निर्णय घेतला होता. शस्‍त्रक्रि‍येची वेळ निश्चित झाल्‍यानंतर त्‍याने कुटुंबियांसोबतच राहणे पसंत केले. आठवडाभर तो कुटुंबियांसोबतच होता. काल (शनिवारी) रात्री त्‍याने शस्‍त्रक्रि‍येबाबत मुलांना माहिती दिली. त्‍यानंतर त्‍याने फेसबुकवरुन चाहत्‍यांना सांगितले. शस्‍त्रक्रिया यशस्‍वी व्‍हावी तसेच चांगल्‍या आरोग्‍यासाठी प्रार्थना करण्‍याचे आवाहन त्‍याने चाहत्‍यांना केले.

काय म्‍हणाला हृतिक चाहत्‍यांना? पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि वाचा...