आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am Single, Nothing Serious In Between Ranveer And Me: Deepika Padukone

दीपिका म्हणते, 'माझ्या आणि रणवीरमध्ये काहीच नाही, मी सिंगल आहे.'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या अफेअरच्या अफवा आहे, परंतु दोघेही त्यांच्या रोमान्सच्या बाताम्यांना नाकारत आहे. या जोडीचे म्हणणे आहे, की दोघांमध्ये काहीच नाहीये. परंतु हे लव्ह-बर्ड अलिकडेच मुंबईच्या एअरपोर्टवर दिसले होते. दोघेही न्यूयॉर्कवरून परतले होते. दीपिकाने तिचा 28वां वाढदिवस रणवीरसोबत न्यूयॉर्कमध्ये साजरा केला होता.
असे जाणवते आहे, की दीपिकाने तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरकडून अफेअरचा धडा घेतला आहे. म्हणूनच तिने रणवीर सिंहसोबतच्या अफेअरविषयी मौन बाळगले आहे. तिने कोणतेही रहस्य न उलगडण्याचा निर्णय घेतला आहे आणि सध्या तिच्या नात्याचा लोकांसमोर खुलासा करण्याची तिची इच्छा नाहीये.
रंजक गोष्ट आहे, की दीपिकाने रणवीरला सुध्दा कडक ताकित दिली आहे त्यांच्या नात्याविषयी काहीच न बोलण्याची.
अलिकडेच, स्क्रिन अवॉर्डच्या दरम्यान जेव्हा रणवीरला त्याच्या आणि दीपिकाच्या न्यूयॉर्कच्या छायाचित्रांविषयी विचारले तेव्हा रणवीरने दुर्लक्ष करून उत्तर दिले, 'काय निरर्थक प्रश्न आहे.'
याव्यतिरिक्त मुंबईमध्ये दीपिकाला रणवीर आणि तिच्याविषयी प्रश्न विचारला, तेव्हा ती रणवीर सिंहविषयी काहीही सांगायला टाळत होती.
असो, आम्ही रणवीर आणि दीपिकाच्या अफेअरविषयी चौकशी चालू ठेवली आणि नंतर दीपिकाला विचारले, तर तिने सांगितले तिच्यात आणि रणवीरमध्ये असे कोणतेही गंभीर नाते नाहीये आणि हेच खरं आहे. परंतु दीपिकाने यावर स्मितहस्य केले.
आम्ही तिला दुसरा प्रश्न विचारून जाणून घेण्याचा प्रयत्न केला, की ती अजून सिंगल आहे का?, तर दीपिका थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली आणि स्पष्ट सांगितले, 'मी सिंगल आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा रणवीर आणि दीपिकाचे काही खास छायाचित्रे...