आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रणवीरसोबत अफेअर नाही, मी अद्याप सिंगलच\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय लीला भन्साळीच्या ‘रामलीला’ सिनेमात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत. अनेकदा दोघे एकत्र दिसले. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र दीपिकाने रणवीरसोबत अफेअर नसल्याचे स्पष्ट केले. ती म्हणाली की, ‘मी अद्याप सिंगलच आहे. माझे कुणाशीच अफेअर नाही. सिद्धार्थ माल्यासोबत नाते तुटल्यानंतर मला स्वत:ला वेळ द्यायचा आहे’.

दीपिकाच्या मनात रणवीरविषयी प्रेमाचा भाव निर्माण झाला असेल मात्र तिने तो व्यक्त केला नाही. याचे दोन कारण असू शकतात. एक म्हणजे रणवीर दीपिकाच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही आणि दुसरा रणबीर कपूर. म्हणून तिने हे नाते तोडले असावे. कारण रणबीर कपूर आणि दीपिका एका सिनेमामुळे पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळे या दोघांमधील जुने प्रेम परत नव्याने फुलत आहे. म्हणूनच दीपिका रणवीर सिंहसोबत अफेअर नसल्याचे म्हणत असावी.