आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Don’T Care About The Rs 200 300 Crore Club: Salman Khan

सलमानचे सर्वाधिक सिनेमे \'100 कोटीं\'च्या क्लबमध्ये, \'जय हो\' स्थान पटकावेल?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानचा 'जय हो' सिनेमा रुपेरी पडद्यावर रिलीज झाला आहे. सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याच्या कमाईविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. कारण मागच्या वर्षी (2013) अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर नवीन इतिहास रचला आहे. म्हणून सलमानच्या 'जय हो'विषयीसुध्दा अनेक आशा-अपेक्षा आहेत. हा सिनेमाही कमाईच्या बाबतीत मागे राहू शकत नाही असा अंदाज प्रत्येकाचा आहे. सिनेमा तर रुपेरी पडद्यावर आला आहे, परंतु सलमान म्हणतो, त्याला 200-300 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवण्याची चिंता नाहीये.
'जय हो' या वर्षीचा पहिला ब्लॉकब्लस्टर सिनेमा मानला जात आहे. सिनेमामध्ये सोहेल खानच्या प्रॉडक्शन कंपनीसोबतच सुनील लुल्ला यांचे पैसे लावण्यात आले आहे. सिनेमाचे दिग्दर्शन सोहेल खाननेच केले आहे.
'जय हो' सलमानसाठी एक महत्वपूर्ण सिनेमा आहे, कारण तो सोहेलने दिग्दर्शित केले आहे. या सिनेमात तब्बू आणि डॅनीसोबतच अनेक स्टार्स दिसणार आहेत. त्यांचे सलमानसोबत कोणते ना कोणते कनेक्शन असणार आहे. या सर्वांना सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी होण्याची अपेक्षा आहे.
सलमानचे यापूर्वी अनेक सिनेमे 100 कोटी क्लबमध्ये सामील झाले आहेत, परंतु 'जय हो'विषयी त्याच्या मनात कोणती भिती आहे, जाणून घ्या पुढच्या स्लाइड्सवर...