आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Get More Offers For Direction Says Prabhu Deva

प्रभुदेवा म्हणतो, मला चित्रपट दिग्दर्शनासाठी अनेकांकडून विचारणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी 'एबीसीडी' एनी बडी कॅन डान्स चित्रपटात दिसणार्‍या नृत्यदिग्दर्शक, अभिनेता व दिग्दर्शक प्रभुदेवाने दिग्दर्शन करण्यासाठी अनेकांकडून विचारणा होत असल्याचे म्हटले आहे. मात्र, आपले पहिले प्रेम नृत्यदिग्दर्शनच आहे, अशी कबुली त्याने दिली. मला अभिनेत्याऐवजी दिग्दर्शक म्हणून विचारणा होत आहे. प्रत्येक जण माझ्याकडे दिग्दर्शक म्हणून पाहतो. ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. एखादी व्यक्तिरेखा योग्य वाटल्यास मी अभिनय करू शकतो. मी नृत्यदिग्दर्शन, दिग्दर्शन व अभिनय केला आहे. हे सर्व प्रकार माझ्या कामाचा भाग आहेत, असे प्रभू म्हणाला.