आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रशियन आणि हिंदीतून केली मी शिवीगाळ, सेंसॉरने सिनेमा बॅन करायला नको\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सैफ अली खानने आपल्या आगामी 'गो गोवा गॉन' या सिनेमात भरपूर शिवीगाळ केली आहे. खुद्द सैफनेच हे कबूल केले आहे. 'गो गोवा गॉन'चा निर्मात असलेल्या सैफने अलीकडेच आपल्या या सिनेमाचे म्युझिक लाँच केले. या कार्यक्रमाला सिनेमाची स्टारकास्ट आणि संगीतकार सचिन-जिगर हजर होते. यावेळी जॉम्बीसने परफॉर्मही केले.

या कार्यक्रमात सैफने सिनेमातील संवादांविषयी सांगितले की, ''या सिनेमात रशियन आणि हिंदी भाषेतील शिव्यांचा वापर करण्यात आला आहे. मला आशा आहे की, सेंसॉर हा सिनेमा बॅन करणार नाही आणि याला ए प्रमाणपत्र देईल.''

या सिनेमात सैफने जॉम्बी हंटरची भूमिका साकारली आहे. जॉम्बीसवर आधारित असलेला हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा असल्याचे म्हटले जात आहे. राज निदिमोरु आणि कृष्णा डी. के दिग्दर्शित हा सिनेमा 10 मे रोजी रिलीज होणार आहे.

एक नजर टाकुया या सिनेमाच्या म्युझिक लाँच इवेंटमधील क्षणचित्रांवर...