आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

....आणि सोनाक्षी झाली बाथरूम सिंगर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला आयुष्यात गायिका होण्याची इच्छा होती. सोनाक्षीला मनापासून वाटत होते की एखाद्या गाण्याच्या रिअ‍ॅलीटी शोमध्ये सहभागी होऊन आपल्या मनातील इच्छा पूर्ण करावी.
सोनाक्षीने सांगिलते की, जेव्हा इंडियन आयडल पहिल्यांदा सुरु झाले होते, तेव्हा मी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. मला ऑडिशन देण्याची खूप इच्छा होती परंतु दुर्भाग्याने मी गायिका न बनता बाथरूम सिंगर होऊन बसले. २५ वर्षीय सोनाक्षीला या कार्यक्रमात त्यावेळी सहभागी होता आले नाही. परंतु या कार्यक्रमाच्या सहाव्या पर्वात आपल्या 'जोकर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती दाखल झाली. अशा रीतीने या कार्यक्रमात सहभागी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले.
कार्यक्रमात तिने सांगितले की, आपल्याला जीवनात काय करायचे आहे याची निवड परमेश्वरच करतो, जसे की माझ्यासाठी देवाने अभिनय क्षेत्र निवडले. सोनाक्षी आणि अक्षय कुमार 'जोकर' या 'चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या महिन्याच्या शेवटी हा चित्रपट रिलीज होणार आहे.