आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Still Believe In Judiciary And Will Look For Legal Options: Sanjay Dutt

'आपल्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास, शोधतोय दुसरा मार्ग'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1993 सालच्या मुंबई साखळी बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील निकालामुळे अभिनेता संजय दत्त खूपच दुःखी झाला आहे. बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सुप्रीम कोर्टाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या कठीण परिस्थितीत संजयला त्याचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराची भक्कम साथ मिळाली आहे. बातमी समजताच विद्या बालन, सुजॉय घोष, राजकुमार हिराणी, मिलन लुथरा यांच्यासमवेत अनेक सेलिब्रिटी संजयच्या घरी पोहोचले. जवळच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर संजयने या प्रकरणावर मीडियाला आपली प्रतिक्रिया दिली.

संजयने सांगितले की, मी निर्णयाच्या कॉपीची प्रतिक्षा करतोय. कॉपी बघून पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा माझा विचार आहे. माझा आपल्या देशातील न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. यावेळी माझे कुटुंबीय माझ्यासोबत असून मी खंबीर आहे.''

ही शिक्षा कमी करण्यासाठी संजय दत्त हा प्रयत्न करणार आहे.