आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Want To Enter My Son Production Field Actress Vandana Gupte

माझ्या मुलाला निर्मिती क्षेत्रात उतरवायचंय - अभिनेत्री वंदना गुप्ते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘गेली 42 वर्षे चित्रपट व नाट्य क्षेत्रात समाधानकारक व यशस्वी काम करताना माझ्या मुलाने मला पाहिले आहे. त्याला या क्षेत्रात रस आहे. केवळ याच कारणामुळे त्याला निर्मिती क्षेत्रात उतरवण्याची माझी इच्छा आहे,’ असे मनोगत प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.
वंदना यांचा मुलगा अभिजित व्यवसायाने अभियंता आहे. अमेरिकेहून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. पण आपल्या आईचे या क्षेत्रातील काम जवळून पाहिल्याने या क्षेत्राशी त्याचा पुरेसा परिचय आहे. त्याला रसही आहे. त्यामुळे उत्तमोत्तम नाटक वा चित्रपटाची निर्मिती करावी, अशी इच्छा वंदना यांनी व्यक्त केली. स्वत:च्या आगामी कामाबाबत बोलताना त्यांनी आता ‘चरित्र भूमिका करायला आवडतील’ असेही मोकळेपणाने सांगितले. वयानुसार भूमिका बदलाव्यात असे त्यांना वाटते; पण चरित्र भूमिका स्टिरिओटाइप नसाव्यात हा त्यांचा आग्रह आहे.
‘आंधळी कोशिंबीर’मध्ये भूमिका
पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आदित्य इंगळे दिग्दर्शित व लिखित ‘आंधळी कोशिंबीर’ हा विनोदी चित्रपट प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे आदित्य आणि आनंद ‘पाऊलवाट’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. ‘सुखांत’ आणि नुकताच आलेला ‘तेंडुलकर आऊट’ या चित्रपटाची निर्मिती करणार्‍या अनुया म्हैसकर यांच्या सुधा प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
नातेसंबंधांवर आधारित चित्रपट
नातेसंबंधांवर विनोदी पद्धतीने भाष्य करणारा हा धमाल, पण नकळत संदेश देणारा चित्रपट आहे. या चित्रपटात वंदना यांची मध्यवर्ती भूमिका आहे. त्यांच्याबरोबर अशोक सराफ, प्रिया बापट, अनिकेत विश्वासराव, हृषीकेश जोशी, आनंद इंगळे, मृण्मयी देशपांडे, हेमंत ढोमे यांच्याही भूमिका आहेत. वैभव जोशी यांची गीते असून अविनाश-विश्वजित यांनी संगीत दिले आहे.