आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IIFA Awards: Deepika, Parineeti, Sridevi, Madhuri Set The Stage On Fire

माधुरी आणि श्रीदेवीचे लटके-झटके बघून चाहते झाले दंग, बघा IIFAची खास क्षणचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकमकाऊ - आयफा 2013 पुरस्कारांत ‘बर्फी’ सिनेमाचा बोलबाला राहिला. शनिवारी रात्री रंगतदार सोहळ्यात बर्फीला सर्वोत्कृष्ट सिनेमा, मुख्य भूमिकेसाठी रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. अनुराग बासू यांना याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान मिळाला. ‘कहानी’ सिनेमातील भूमिकेसाठी विद्या बालन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. 'बर्फी'साठी प्रीतम चक्रवर्ती यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट कथानकाचा पुरस्कारही 'बर्फी'नेच जिंकला. अन्नू कपूर यांना ‘विकी डोनर’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहअभिनेता, तर अनुष्का शर्माला ‘जब तक है जान’ सिनेमासाठी सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून 'अग्निपथ' सिनेमासाठी अमिताभ भट्टाचार्य यांना गौरवण्यात आले.
तीन दिवस चाललेल्या या रंगारंग कार्यक्रमात बी टाऊनच्या आघाडीच्या कलाकारांनी एकापेक्षा एक परफॉर्मन्स सादर केले. आयफाच्या मंचावर माधुरी दीक्षित आणि श्रीदेवीचे लटके-झटकेही बघायला मिळाले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा आयफा सोहळ्याची खास क्षणचित्रे...