आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IIFA Awards: Shah Rukh Khan Can't Keep His Hands Off Deepika Padukone

IIFA: अरे हे काय... शाहरुख दीपिकाचा हात सोडेच ना !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानसह बी टाऊनचे अनेक सेलिब्रिटी 14 व्या आयफा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मकाऊत दाखल झाले आहेत. या अवॉर्ड सोहळ्यात किंग खान शाहरुख अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या हातात हात घालून फिरताना दिसला. शाहरुख यंदाचा आयफा सोहळ्याचा होस्ट असून यावेळी त्याच्याबरोबर स्टेजवर दीपिकाही होती. यावेळी या दोघांनीही स्टेजवर चांगलीच धमाल-मस्ती केली.

स्टेजवरुन खाली उतरल्यानंतरसुद्धा शाहरुख दीपिकाबरोबर धमाल करताना दिसला. कार्यक्रम होस्ट करुन झाल्यानंतरसुद्धा शाहरुखने दीपिकाचा हात सोडला नाही. आता या दोघांनी अलीकडेच 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाचे शूटिंग संपवले. त्यामुळे या दोघांमध्ये चांगले बाँडिंग निर्माण झाले असावे, हे कुणालाही समजेल. पण ज्याप्रकारे शाहरुख दीपिकाचा हात पकडून होता, ते बघून कुणाच्याही भुवया उंचावणे स्वाभाविकच होतं.

रोचक गोष्ट म्हणजे या अवॉर्ड नाईटला हे दोघेही एकाच रंगाच्या कपड्यांमध्ये दिसले. एकीकडे शाहरुख आपल्या ब्लॅक सूटमध्ये डॅशिंग दिसत होता. तर दुसरीकडे दीपिकासुद्धा ब्लॅक आणि सिल्व्हर कलरच्या ड्रेसमध्ये हॉट दिसली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कशाप्रकारे दीपिका आणि शाहरुखने एकमेकांना कंपनी देत आयफाची मजा लुटली...