आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्याने दिले स्पष्टीकरण, म्हणाली 'मी प्रेग्नेंट नाही'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक सुजॉय घोष त्याच्या 'दुर्गा राणी' या आगामी सिनेमात कंगना राणावतला घेण्याचा विचार करत आहे. असे सांगितले जात आहे, की कंगनापूर्वी तो विद्या बालनला घेण्याच्या विचारात होता, परंतु तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या ऐकून त्याने तिला दुर्लक्ष करून कंगनाचा विचार केला. परंतु विद्याची प्रेग्नेंसीच्या चर्चा अफवा असल्याचे सांगितेल जात आहे. विद्याने स्वत: या गोष्टीचे स्पष्टिकरण दिव्य मराठी डॉट कॉमला दिले आहे.
विद्याने सांगितेल, 'मी प्रेग्नेंट नाही.' तिने तिच्या प्रेग्नेंसीची बातमी पूर्णत: नकारली आहे. परंतु सुजॉय हा सिनेमा कंगनासोबत करू शकतो याची दाट शक्यता आहे. कंगनाच्या 'क्वीन'मधील अभिनयाची बरीच प्रशंसा झाली असून तिच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर इतर सिनेमांपेक्षा चांगली कमाईसुध्दा केली आहे.
अशा अफवा आहे, की विद्या आणि तिचा पती सिध्दार्थ रॉय कपूर यांच्या आयुष्यात लवकर नवीन पाहूणा येऊ शकतो. अलीकडेच, विद्याने 'शादी के साइड इफेक्ट्स' या सिनेमात फरहान अख्तरसोबत काम केले होते. सिनेमा रिलीज होण्याच्या वेळी विद्या प्रेग्नेंट असल्याच्या ब-याच चर्चा झाल्या होत्या. तिला त्यावेळी एका प्रसिध्द हॉस्पिटलमध्येसुध्दा बघितल्या गेले होते.
विद्याने 'शादी के साइड इफेक्ट्स'मध्ये आईची भूमिका साकारली होती आणि तिने सिनेमाच्या प्रमोशनसाठी खूप मदत केली होती.