आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: बालपणी सनीसोबत अशी आनंदी असायची हेमा यांची लाडकी अहाना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची ड्रिमची गर्ल हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अहाना देओल लग्नाच्या बेडीत अडकली आहे. काल (2 फेब्रुवारी) रात्री तिने उद्योगपती वैभव वोरासोबत लग्न केले आहे. या लग्नात बॉलिवूडचे सर्व दिग्गज स्टार्स उपस्थित होते. याव्यतिरिक्त राजकिय आणि उद्योग क्षेत्रातील सेलिब्रिटीजसुध्दा यांच्या रिसेप्शनमध्ये सामील झाले होते.
धर्मेंद्र यांचे दोन्ही मुले सनी आणि बॉबी देओल अशावेळी नेहमीच माध्यमांच्या चर्चेत असतात. रक्षाबंधन सण जवळ येताच माध्यमांची नजर यांच्यावर असते. जेव्हा ईशाचे लग्न झाले तेव्हाही दोघांची लग्नात अनुपस्थिती दिसली होती.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र आणि हेमा यांनी प्रकाश कौर यांची माफी मांगून सांगितले, की सनी आणि बॉबी अहानाच्या लग्नापासून दूर राहिलेलेच ठिक आहेत. हे सर्व अंदाज व्यक्त केले जात आहेत, याचे कोणतेही ठोस पुरावे माध्यमांजवळ नाहीये.
परंतु हे वास्तव आहे, की सनी आणि बॉबी त्यांच्या बहिणींच्या (ईशा आणि अहाना) लग्नात सामील झाले नव्हते. कुणीच दोन्ही बहिणींसोबत सनीची छायाचित्रे बघितलेले नाहीत. परंतु इंटनेटवर एक जूने छायाचित्रे आहे, ज्यामध्ये सनी त्याची सावत्र बहिण अहाना आणि करणसोबत दिसत आहे.
छायाचित्रामध्ये सनीच्या आनंदी चेह-यावरून स्पष्ट होते, की तो त्याच्या बहिणीवर खूप प्रेम करतो.
देओल कुटुंबातून सासरी गेलेली अहाना आता वोरा कुटुंबीयांची सून झाली आहे. परंतु धर्मेंद्र, हेमा आणि ईशासोबत घालवलेला तिचे दिवस तिला नेहमीच आठवणीत राहतील. चला बघूया, देओल कुटुंबीयांसोबत अहानाची काही खास छायचित्रे...