आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...म्हणून इमरानने सोडली भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांनी ‘दोस्ताना’ सिनेमात ‘गे’ची भूमिका केली होती. मात्र इमरान हाश्मीने ही भूमिका करण्यास नकार दिला आहे. अलीकडेच इमरानला होमोसेक्शुअल किलरच्या भूमिकेची विचारणा झाली होती. सिनेमाची कथाही त्याला आवडली होती, मात्र ही भूमिका करावी की नाही यावर तो गोंधळात होता. यासाठी त्याने महेश भट्ट यांचासुद्धा सल्ला घेतला होता. त्यांनीसुद्धा ही भूमिका कर म्हणून सांगितले होते. तरीसुद्धा इमरान ने भूमिका करण्यास नकार दिला.
इमरानच्या मते, त्याच्या चाहत्यांमध्ये मुली आणि गृहिणीसुद्धा आहेत. त्यांना कदाचित ही भूमिका आवडली नसती, म्हणून त्याने आपल्या चाहत्यासाठी हा सिनेमा सोडला. इमरान आता आपली चांगली इमेज करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून तो आता विचार करूनच भूमिका निवडणार असल्याचे दिसते.

इमरानने विक्रम भट्ट यांच्या ‘फुटपाथ’ मधून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. मात्र ‘र्मडर’ सिनेमातून तो प्रकाशझोतात आला. हा रोमँटिक सिनेमा होता. इमरानला किसर किंग म्हणूनही ओळखले जाते.