आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमरान हाशमीच्या चार वर्षीय मुलाला कॅन्सर, कुटुंबीयांना बसला मोठा धक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवार हा दिवस अभिनेता इमरान हाशमीसाठी खूपच वाईट प्रसंग घेऊन आला. बातमी आहे, की इमरानचा चार वर्षीय मुलगा अयानला कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे त्याचा कॅन्सर फस्ट स्टेजवर आहे. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सोमवारी अयानच्या करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याला कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे.
वैद्यकीय अहवालात त्याच्या किडनीमध्ये कॅन्सची गाठ असल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांनी लवकरात लवकर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले आहे.
सांगितलं जातंय, की शस्त्रक्रिया करून डॉक्टर त्याची कॅन्सरची गाठ काढणार आहे, जेणेकरून किडनी आणि शरीराच्या इतर अवयवांवर त्याचा काही परिणाम होणार नाही. शस्त्रक्रियेनंतर त्याच्यावर केमोथेरपीची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे आजार पूर्णत: बरा होऊ शकतो आणि अयानला नवीन आयुष्य मिळू शकतं.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इमरानचे कुटुंबीय सदस्य अयानच्या आजारावर दुस-या डॉक्टरांकडूनही सल्ला घेत आहे. अयानला उपचारासाठी अमेरिकेला नेण्याचीही गरज पडू शकते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर वृत्त...