आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Imran Khan And Sonakshi Sinha To Reprise Tayyab Ali Pyaar Ka Dushman Song

आता इम्रान म्हणणार ‘तयब अली प्यार का दुश्मन..’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1977 मध्ये आलेल्या मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘अमर अकबर अँन्थोनी’ या सिनेमातील लोकप्रिय गीत ‘तयब अली प्यार का दुश्मन..’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना नव्या रूपात पाहायला मिळणार आहे.

ऋषी कपूर आणि नीतू सिंग या जोडीवर चित्रीत झालेले हे गाणे इम्रान खान आणि सोनाक्षी सिन्हावर चित्रीत करण्यात आले आहे. ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दुबारा’ या सिनेमात हे गाणे घेण्यात आले आहे. रजत अरोरा यांनी लिहिलेले हे नवे गाणे प्रीतम यांनी कंपोज तर राजू खान यांनी कोरियोग्राफ केले आहे. जुन्या गाण्याचे अधिकार विकत घेतल्याचे मिलन लुथरिया सांगतात. तसेच या गाण्याचे चित्रीकरण मुंबईतच सहा दिवसांत पूर्ण केल्याचेही त्यांनी सांगितले. हा सिनेमा येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यात अक्षय कुमार आणि सोनाली बेंद्रे मुख्य भूमिकेत आहेत.