आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरच्या भाच्याकडे सध्या नाही कोणताच सिनेमा, जाहिरातीतून कमवतोय पैसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाचा इमरान खानजवळ सध्या कोणताही सिनेमा नाहीये. त्यामुळे तो त्याचा वेळ जाहिरातीत घालवत आहे.
सांगितले जात आहे, की तो एका गुजराती सिनेमात सुपहिरो बनणार आहे. 'भावेश जोशी' नावाचा सिनेमा असून त्याची अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.
तो सध्या अनेक जाहिरातीत झळकत असून टू व्हिलर वेस्पा ब्रांडचा अ‍ॅम्बेसेडरसुध्दा आहे. अलीकडेच त्याने वेस्पाचे नवीन मॉडेल वेस्पा एस लाँच केली आहे. परंतु सिनेमांविषयी सांगायचे झाले तर, सध्या इमरानच्या खात्यात एकही सिनेमा नाहीये. 2013मध्ये इमरानचा 'वन्स अपॉन टाइम इन मुंबई दोबारा' आणि 'गोरी तेरे प्यार मे' हे दोन्ही सिनेमे सुपरफ्लॉप ठरले.
'वन्स अपॉन...'वेळी इमरानचा निर्माती एकता कपूरसोबत वाद झाला होता त्यामुळे त्याच्या हातातून बालाजी फिल्म्सचा 'मिलन टॉकीज' हा सिनेमा गेला. या सिनेमाचे दिग्दर्शन तिग्मांशु धुलिया करणार होता.
इमरानच्या करिअरमधील एकुण एक डझन सिनेमांमध्ये 'जाने तू या जाने', 'आय हेट लव्ह स्टोरीज', 'देल्ली बेली' आणि 'मेरे ब्रदर की दुल्हन' हे सिनेमे हिट ठरले आहेत. त्याचे अनेक सिनेमे रिलीज झाले परंतु त्यांनी ना बॉक्स ऑफीसवर कमाल दाखवली ना समीक्षकांनी त्यांची प्रशंसा केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वडील बनल्यानंतर सुरू करणार एका सिनेमाची शुटिंग...