आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Pics:Amitabh Bachchan Visits Dilip Kumar At Lilavati Hospital

In Pics: दिलीप कुमार यांच्या तब्येतीची चौकशी करायला बिग बी पोहोचले लीलावतीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोमवारी ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारणा केली. दिलीप कुमार यांच्यावर गेल्या 15 सप्टेंबरपासून मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अमिताभ बच्चन सोमवारी रात्री सात वाजता दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी लिलावती रुग्णालयात आले. दोघांनी सुमारे अर्धा तास गप्पा मारल्या. तसंच अमिताभ यांनी दिलीप कुमार यांना प्रकृती स्वास्थ्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रुग्णालयात दाखल केल्यापासून आयसीयूमध्ये असलेल्या दिलीप कुमार यांना आता जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. तसंच त्यांची प्रकृती सुधारत असून त्यांना लवकरात लवकर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.