आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री श्रुती मराठेची आक्षेपार्ह छायाचित्रे इंटरनेटवर, पोलिस तक्रार दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठी अभिनेत्री श्रुती मराठेची काही आक्षेपार्ह छायाचित्रे इंटरनेटवर अपलोड़ करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी श्रुती मराठेने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

श्रुती मराठेने आपल्या करिअरची सुरवात तमीळ चित्रपट इंदिरा विजराने केली. तिने प्रेमसुत्र आणि सनई चौघडे या सारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने बरयाच तमीळ आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली आहे.

श्रुतीने पोलिस तक्रारीत सांगितले आहे, की इंटरनेटवर प्रसिद्ध झालेली छायाचित्रे नान अवनिल्लई -2 या तमीळ चित्रपटासाठी सुमारे ४ वर्षांपूर्वी काढण्यात आली होती. जर ही छायाचित्रे कोणत्याही पब्लिसिटी कॅम्पेनसाठी वापरण्यात आलेली नाहीत तर ती इंटरनेटवर आली कशी?

श्रुतीला तमीळमध्ये श्रुती प्रकाश या नावाने ओळखले जाते. तिने तमीळमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
तमीळ चित्रपटांमध्ये श्रुतीने एवढी लोकप्रियता मिळविलेली आहे, की तिला तमीळ चित्रपटसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री नमिताचा नवीन अवतार मानले जाते. सनई चौघडे या मराठी चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे याच्यासोबत श्रुती मराठे झळकली होती.

आक्षेपार्ह छायाचित्रे इंटरनेटवर झळकल्यानंतर अनेक चाहत्यांनी आणि नातलगांनी फोन करून याची माहिती दिली, असे श्रुतीने सांगितले आहे. श्रुतीची राधा ही बावरी ही मराठी मालिका सध्या बरीच गाजत आहे.

पोलिस तक्रार दाखल करण्यापूर्वी श्रुतीने नान अवनिल्लई -2 या चित्रपटाचे दिग्दर्शक हितेश झाबक यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. त्यांनी श्रुतीला सांगितले, की जरी ही छायाचित्रे चित्रपट प्रमोशनसाठी घेण्यात आली असली तरी त्याचा प्रसिद्धी हक्क माझ्याकडे आहे. मी तो कुणालाही दिलेला नाही. त्यामुळे तिने पोलिस तक्रार दाखल करावी.

माझी एक प्रतिष्ठित चित्रपट निर्माण संस्था आहे. आम्ही कधीही अशा प्रकारच्या स्वस्त प्रसिद्धीत उतरणार नाही, असेही झाबक यांनी सांगितले.

पुढील स्लाईडवर क्लिक करा