आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Sends The Good Road For Best Foreign Film Oscar

CONFIRMED: \'द लंचबॉक्स\'चा पत्ता कट, OSCARSमध्ये जाणार गुजराती फिल्म \'द गुड रोड\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एनएफडीसी)ची निर्मिती असलेला 'द गुड रोड' हा गुजराती सिनेमा ऑस्कर 2013च्या विदेशी भाषा चित्रपट श्रेणीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ऑस्करसाठी नामांकन पटकावणारा 'द गुड रोड' हा पहिला गुजराती सिनेमा ठरला आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला आहे.

अलीकडेच रिलीज झालेला 'द लंचबॉक्स' हा सिनेमा ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र 'द गुड रोड' या सिनेमाने यात बाजी मारली.

'द लंचबॉक्स' या सिनेमाबरोबर 'भाग मिल्खा भाग', 'इंग्लिश विंग्लिश', 'विश्वरुपम', मल्याळम सिनेमा 'सेल्युलॉईड' आणि बंगाली सिनेमा 'शब्दो' यासह 21 सिनेमे या रेसमध्ये होते. मात्र या सर्वांना मागे टाकत 'द गुड रोड'ने बाजी मारली आहे.
एका आधुनिक गुजराती कथेवर आधारित हा सिनेमा ज्ञान कोरिया यांनी दिग्दर्शित केला आहे. ज्ञान कोरिया यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.

या सिनेमाची कथा तीन लोकांभोवती गुंफण्यात आली आहे, जे कच्छच्या वाळवंटात मार्ग विसरतात. 24 तासांत या तिघांच्या जीवनात कोणत्या घडामोडी घडतात याचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे.

या सिनेमात मराठीतील प्रसिद्ध चेहरा सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहे. सोनालीबरोबरच अजय गेही, केवल कत्रोदिया, शामजी धाना केरासिया, प्रियंक उपाध्याय णि पूनम केसरसिंह राजपूत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.