आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interesting Facts About SRK New Movie Chennai Express

दीपिकाला उचलून चक्क 800 पाऊलं चालला शाहरुख, उडाली चांगलीच दमछाक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या आगामी 'चेन्नई एक्स्प्रेस'विषयी लोकांमध्ये उत्सुकता वाढत चालली आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणा-या या सिनेमात कुख्यात डॉनच्या मुलीच्या प्रेमात पडलेल्या तरुणाची कथा रेखाटण्यात आली आहे. प्रेमात पडल्यानंतर त्या तरुणाचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. या तरुणाच्या भूमिकेत शाहरुख खान असून त्याच्या प्रेयसीची भूमिका दीपिका पदुकोणने साकारली आहे.

दक्षिण भारतीय पार्श्वभूमीवर तयार झालेल्या या सिनेमातील एका दृश्यात दीपिकाला उचलून शाहरुखला फे-या मारायच्या होत्या. शाहरुख आपल्याला उचलू शकेल की नाही, याची खात्री स्वतः दीपिकाने शाहरुखलाच विचारुन करुन घेतली. मात्र गंमत अशी की दीपिकाला उचलून चक्क आठशे पाऊलं चालायचे आहे, हे शाहरुखला ठाऊकच नव्हते. त्यामुळे त्याची चांगलीच दमछाक उडाली.

मन्नार (तामिळनाडू) मध्ये होणा-या लग्न परंपरेनुसार नवरदेवाला आपल्या भावी वधुला उचलून आठशे पाऊलं चालायचे असतात. या परंपरेनुसार नवरा-बायकोचे नाते घट्ट होत असल्याची मान्यता आहे.

या सिनेमाच्या शूटिंगशी निगडीत रोचक किस्से जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...