आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिन्यांच्या तपस्येनंतर घडली मिल्खासिंगसारखी बॉडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


या वर्षीचा सर्वांत जास्त चर्चेत राहिलेला चित्रपट भाग मिल्खा भाग उद्या (शुक्रवार) रिलिज होणार आहे. या चित्रपटाचा अभिनेता फरहान अख्तर याने यात मिल्खासिंग यांची भूमिका बजावलेली आहे. या चित्रपटामुळे त्याच्या बॉडीची खूप चर्चा झाली आहे. चित्रपटात फरहानची बॉडी अगदी एखाद्या धावपटूसारखी परफेक्ट दिसत आहे.

त्याची बॉडी आणि अभिनय बघुन खुद्द मिल्खासिंग यांनी सांगितले आहे, की मी फरहानच्या ड्युप्लिकेटसारखा दिसतो. फरहानची बॉडी आणि हॉट लुक बघून मुली अगदी वेड्या होत आहेत. परंतु, असे पिळदार शरीर कमविण्यासाठी फरहानला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. यासाठी त्याने १८ महिन्यांपासून मेहनत घेतली आहे. यासाठी त्याने भात, पोळी आणि ब्रेड खाणे पूर्णपणे बंद केले होते. सुमारे सहा महिने यातील कोणताच पदार्थ खाल्ला नाही. तसेच दारूला हातही लावला नाही.

प्रत्येक आठवड्यातील सहा दिवस दोन वेळा चार ते सहा तास जिममध्ये तो मेहनत घेत होता. त्यासाठी तो मुंबईतून बाहेरही गेला. फरहानने धावण्याच्या स्टाईलसाठी वेगळे ट्रेनिंगही घेतले. हा चित्रपट बघितल्यानंतर मिल्खासिंग बरेच भावूक झाले होते. माझ्या आठवणी ताज्या करणारा हा सिनेमा आहे, असे त्यांनी चित्रपट बघितल्यावर सांगितले.

प्रसुन जोशींनी मिल्खासिंगसोबत घालविले ६० तास