आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview With Bollywood Actrees Manisha Koirala

मृत्यूच्या स्पर्शाने बदलले! अभिनेत्री मनिषा कोईरालाचे आयुष्य चित्रपटापेक्षा वेगळे नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आजारपणानंतर माझे आयुष्य अधिक अनमोल असल्याची जाणीव झाली. मृत्यूने आजाराच्या रूपाने स्पर्श केला होता. आता आयुष्य पूर्णपणे बदलले आहे, अशा शब्दांत बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाने ह्रदगत मांडले.
‘बॉम्बे’, ‘1942- अ लव्ह स्टोरी’, ‘दिल से’ यांसारख्या चित्रपटांतून आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या 44 वर्षीय मनीषाचे वैयक्तिक आयुष्यदेखील एखाद्या चित्रपटापेक्षा वेगळे वाटणार नाही. कारण मनीषाने दोन वर्षांपूर्वी कर्करोगावर मात केली. आता ती पूर्णपणे बरी झाली असून आनंदाने जीवन जगू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मनीषाने अनेक मुद्दय़ांवर मनमोकळेपणाने गप्पा केल्या. काही दिवसांपूर्वी मृत्यूने स्पर्श केला होता. आता मात्र मी आयुष्याच्या नवीन टप्प्याला सामोरे जात आहे. आज प्रत्येक सूर्यास्त, प्रत्येक हस्तांदोलन मला खूप मोलाचे वाटते; परंतु माझा आजार हा सामाजिक चर्चेचा विषय ठरू नये, असे वाटते. 1991 मध्ये सौदागर चित्रपटातून बॉलीवूडमध्ये मनीषाने डेब्यू केला.
जगजागृतीसाठी पुढाकार
कर्करोगासंबंधी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आपण पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सेलिब्रिटी म्हणून काही मदत लागणार असेल तर मी सदैव सहकार्यासाठी तयार आहे. महिलांमध्ये अशा प्रकारची जागृती करण्याची माझी इच्छा आहे. महिलांनी खूप काही देताना स्वत:च्या प्रकृतीकडेदेखील लक्ष दिले पाहिजे, असे मनीषा कोईरालाला वाटते.
पेंटिंग, एनजीओ आणि पुस्तक : चित्रकलेमध्ये गती असल्याने बराचसा वेळ देते, शिवाय स्वत:ची एनजीओ स्थापन करण्यासंबंधीदेखील माझे प्रयत्न सुरू आहेत. आयुष्यावर पुस्तक लिहिण्याची इच्छा आहे. त्यावर काम सुरू आहे.
तणावाखालील काळ
कर्करोग झालेल्या व्यक्तीला खूप मोठय़ा तणावाखाली जगावे लागते. मानसिक स्वरूपाचा प्रचंड ताण अशा व्यक्तीला सहन करावा लागतो. एवढेच नाही, तर कर्करोगाच्या काही प्रकारात तो पुन्हा परतण्याची भीतीदेखील असते, असा वेदनादायी अनुभव मनीषाने शेअर केला.