आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या ‘मासूमच्या’ कथेत बदल होईल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरिक सिगलच्या ‘मॅन, वुमन अँड चाइल्ड’ या कादंबरीवर 1983 मध्ये शेखर कपूरने ‘मासूम’ बनवला होता. त्या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांनी उत्कृष्ट अभिनय केला होता. चित्रपटात बाल कलाकारांच्या भूमिकेत ऊर्मिला मातोंडकर आणि जुगल हंसराजदेखील होते. आणखी एका बालकलाकारांसोबत ‘लकडी की काठी’ चित्रीत केलेले गाणे आजदेखील मुलांचे आवडते आहे.

अलीकडेच हिमेश रेशमिया हा चित्रपट नव्याने बनवणार असल्याची चर्चा होती. दिग्दर्शनाची जबाबदारी तो बेदब्रत पेनवर सोपवणार होता. त्यांनी अलीकडेच ‘चिटगाँग’ बनवला आहे. मासूमच्या भूमिके साठी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याशी संपर्क करण्यात आला होता. त्यांनी होकारदेखील दिला होता. मात्र अभि-अँश त्याची पहिली पसंत नसल्याचे कळते. बेद यांनी इरफान खान आणि विद्या बालनसोबत संपर्क केला होता. मात्र दोघांनीही त्यांना नकार दिल्याचे कळते. 25 वर्षांपूर्वी ‘मासूम’ मध्ये नसीरुद्दीन शाह यांनी जो अभिनय केला त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. मग त्याला आणखी चांगले करण्याची गोष्ट वेगळीच, असे इरफान बेद यांना म्हणाला. त्यामुळे बेदब्रत पटकथेवर नव्याने काम करत आहेत.