आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूड चित्रपटात इरफान खानची वर्णी, ‘ज्युरासिक पार्क-4’मध्ये झळकणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डायनोसोरच्या विलुप्त प्रजातीला क्लोनिंगद्वारे पुन्हा जिवंत करण्याच्या कथेवर 1990 मध्ये मायकल क्रिचटन यांची कादंबरी आली होती. यावरच जुरासिक पार्क मालिकेतील तीन चित्रपट आले. आता चौथा चित्रपट ‘ज्युरासिक वर्ल्ड’ तयार होत आहे. काही वर्षांपासून फक्त कागदावरच अटकलेल्या चित्रपटाची आता रूपरेखा स्पष्ट झाली आहे. निर्माते स्टीव्हन स्पीलबर्गच्या या चित्रपटात हॉलिवूडचे चेहरे असतीलच याबरेाबरच भारतीय अभिनेते इरफान खानदेखील दिसणार आहेत. अलीकडेच या चित्रपटासाठी स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी इरफान खानसोबत चर्चा केली होती. त्यावेळी काही ठरले नव्हते मात्र आता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
तीन-चार महिन्यांपूर्वी त्यांना कास्ट करण्यात आले होते. याची बातमी पहिल्यांदा दिव्य मराठीने दिली होती. आता त्यांची भूमिका ठरली आहे. सूत्रानुसार इरफान यात मि. पटेलची भूमिका साकारणार आहेत. जी एक श्रीमंत व्यक्ती असते आणि मोठ्या जिवांच्या पार्कचा मालक असतो. चित्रपटाचे दिग्दर्शक कॉलिन ट्रेवॉरो आहेत.
ज्यांनी 2012 मध्ये ‘सेफ्टी नॉट गॅरंटेड’ बनवला होता. त्याचे जगभरात कौतुक झाले होते. ‘ज्युरासिक पार्क-4’ हा चित्रपट ज्युरासिक पार्क मालिकेच्या मागील तीनही चित्रपटांसारखाच असेल. कथा पहिल्या चित्रपटाच्या 22 वर्षांनंतर सुरू होईल. कॉलिनच्या मते, या चित्रपटात भीतिदायक दृश्य आणि काही अँक्शन दृश्यदेखील आहेत. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच हादेखील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा ठरेल. सगळ्यात जास्त जगभरातील लहान मुलांना खूप आवडेल, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.