आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Irfan Khan To Play Dawood Ibrahim's Shooter In Film

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंडरवर्ल्डवर आधारित आणखी एक सिनेमा, इरफान होणार दाऊदचा शुटर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अंडरवर्ल्डच्या लोकांवर जितके सिनेमे बनलेले आहेत तितके देशाच्या ऐतिहासिक पात्रांवरदेखील बनले नाही. दाऊद इब्राहिम, छोटा राजन, माया डोलास, मन्या सुर्वे आणि हाजी मस्तानसारख्या गुन्हेगारांवर सिनेमे बनलेले आहेत. आता या यादीत शूटर फिरोज कोंकणीचे नाव जोडले आहे. फिरोजच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच सिनेमागृहात येणार आहे. याचे दिग्दर्शन अजय कश्यप यांनी केले आहे. निर्माते रहीम खान आहेत. रहीमने याआधी ‘चोरी चोरी चुपके चुपके’ बनवला होता.

या सिनेमात इरफान खान मुख्य भूमिकेत आहे. अलीकडेच इरफान ‘डी डे’मध्ये दिसला होता. दाऊद इब्राहिमशी मिळत्याजुळत्या गुन्हेगाराला पाकिस्तानातून भारतात आणण्याची ही कथा होती. फिरोज कोंकणीच्या रूपात जर तो पडद्यावर आला तर याच विषयावर त्याचा हा दुसरा सिनेमा होईल.

कोण होता फिरोज कोंकणी जाणून घ्या..