आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is Aamir Khan Replacing Sanjay Dutt As New Munnabhai?

संजय तुरुंगातून बाहेर येताच ‘मुन्नाभाई 3’ सुरू करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


राजकुमार हिरानी यांचे ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘3 इडियट्स’ सुपर डुपर हिट ठरले होते. त्यांच्या तिसर्‍या चित्रपटापासून मुन्नाभाईचा पुढचा भाग बनणार असल्याच्या बातम्या येत होत्या. चित्रपटाचे नाव ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ असे ठरले होते. त्यात संजय दत्त इंग्रजांना इंग्रजी शिकवताना दाखवले जाणार होते. मात्र असे झाले नाही.

पुढे संजय दत्तच्या सुनावणी दरम्यान मुन्नाभाई चित्रपटात आमिर खान संजयची भूमिका करणार अशी चर्चा होती. मात्र आमिरने नकार दिला तो म्हणाला की, संजयच्या शिवाय ही भूमिका दुसरा कोणीही करू शकत नाही. त्यामुळे हिरानी यांनी आमिर सोबत ‘पीके’ चित्रपटाची तयारी सुरू केली आता चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

मात्र प्रेक्षकांना हिरानी नाराज करणार नाहीत ते म्हणाले की, संजय तुरुंगातून सुटल्यावर आम्ही ‘मुन्नाभाई 3’ चित्रपटावर काम सुरू करू. हैदराबादमध्ये सुरू असलेल्या इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये हिरानी बोलत होते.

बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याने प्रकरणी संजय दत्त शिक्षा भोगत आहे. राजकुमार हिरानीच्या चित्रपटामुळेच संजयने बॉलिवूडमध्ये पुन्हा आपली जागा निर्माण केली होती. हिरानी संजयचे चांगले मित्र आहेत. लोकांनीदेखील त्याच्या चित्रपटांना पसंती दिली होती. आता पुढचा चित्रपट कसा राहील, याची अपेक्षा लोकांना लागली आहे.