आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is Sunil Grover Indicating The Gutthi Show Is On Cards ?

\'गुत्थी\' बनून सुनीलने दाखवला व्हायकॉमला ठेंगा, घेऊन येतोय स्वतःचा शो !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या स्टॅण्डअप कॉमेडी शोमधून गुत्थीची भूमिका साकारणारा अभिनेता सुनील ग्रोवर शोमधून बाहेर पडला आहे. मात्र आता तो काही तरी नवीन आणि मोठे करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील स्वतःचा एक शो घेऊन छोट्या पडद्यावर लवकरच दाखल होणार आहे.
सुनीलने फेसबुक फॅन पेजवर एक कव्हर फोटो अपलोड करुन त्याखाली 'द गुत्थी शो' असे नमूद केले आहे. या छायाचित्रावरुन सुनीलने स्वतःचा एक नवीन शो डिझाइन केला असल्याचे म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच व्हायकॉम 18ने एक सार्वजनिक नोटिस जाहिर करुन म्हटले होते, की गुत्थी या पात्रावर त्यांचा हक्क असून हे पात्र कुणीही आपल्या शोमध्ये वापरु शकणार नाही. मात्र सुनीलने व्हायकॉमच्या या नोटिसकडे दुर्लक्ष केले असून त्याने केवळ गुत्थीचे पात्र वापरले नसून थेट व्हायकॉमसह टक्कर घेतलेली दिसत आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सुनीलची आगामी योजना आणि कुठे त्याने गुत्थीचे पात्र साकारले आहे, त्याविषयी सांगत आहोत.