आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is This Anushka Sharma With Virat Kohli Holding Hands?

जगासमोर उघड झाले प्रेम, न्यूझीलंडमध्ये एकत्र एन्जॉय करतायेत विराट-अनुष्का!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संघाचा युवा फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूडची बबली गर्ल अनुष्का शर्मा यांच्यात मैत्रीपलीकडचे नाते निर्माण झाल्याची बातमी divyamarathi.comने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वप्रथम आपल्या वाचकांना दिली होती. हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर काही महिन्यांनी अनुष्का आणि विराटला एकत्र बघितले गेले होते.
आता यांच्याबाबतीत आणखी एक ताजी माहिती समोर आली आहे. विराटशी केवळ मैत्रीचे नाते असल्याचे सांगणारी अनुष्का शर्मा आपल्या या खास 'मित्रा'ला भेटण्यासाठी थेट न्यूझीलंडमध्ये दाखल झाली. सध्या न्यझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचे कसोटी सामने सुरू आहेत. त्यामुळे अनुष्काने विराटला भेटण्यासाठी थेट न्यूझीलंड गाठले. तेथील या दोघांचे एक छायाचित्र सध्या इंटरनेटवर वायरल झाले आहे. या छायाचित्रात एका बाजुला विराट कोहली दिसत असून दुसरीकडे पाठमोरी मुलगी दिसत आहे. मात्र या तरुणीला पाहता ती अनुष्काच असल्याचे दिसून येत आहे.
या दोघांचे हे छायाचित्र त्यांच्या एका चाहत्याने ट्विटरवर अपलोड करुन त्याखाली पोस्ट केले, 'Virat Kohli and Anushka Sharma spotted holding hands in New Zealand.' एकंदरीतच या दोघांच्या नात्याविषयी आता चर्चा तर होणे स्वाभाविकच आहे, नाही का.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या याविषयी बरंच काही...