आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गप्प का आहे ईशा ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईशा शेरवानी आगामी ‘डेव्हिड’ सिनेमात मुख्य भूमिका करत आहे. मात्र आपल्या भूमिकेविषयी ती गप्प आहे. आपली भूमिका आणि सिनेमाविषयी तिने माध्यमाशी कोणतीच चर्चा केली नाही. मात्र या सिनेमातील तिची भूमिका कोणापासून लपून राहिलेली नाही. ती या सिनेमात एका मुक्या आणि बहिर्‍या मुलीची भूमिका करत आहे. त्या मुलीला जीवनात खूप काही करायचे असते. सिनेमात सुपरस्टार असलेल्या विक्रमची ती प्रेमिका असते.

इतकी महत्त्वाची भूमिका असूनही ईशाला सिनेमाच्या प्रमोशनपासून दूर ठेवण्यात आले आहे. आता ही निर्मात्यांची काही योजना आहे की तिचे खरंच त्यांच्याशी भांडण झाले आहे, हे लवकरच कळेल.