आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • It Was Music Composer Naushad Who Gave Tun Tun Her First Break In Industry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईला पळून आली होती टुनटुन, ब्रेक मिळवण्यासाठी दिली होती आत्महत्येची धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे म्हटले जाते, की हिंदी सिनेमातील कॉमेडीची पहिली उस्ताद ही टुनटुन होती. रंजक गोष्ट म्हणजे ग्लॅमरस नसूनसुद्धा टुनटुनने आपल्या मजेशीर अंदाजाने सगळ्यांची मनं जिकंली. लठ्ठ असूनदेखील अभिनयासमोर लूक्स काही कामाचे नाही, हे तिने दाखवून दिले होते.

हसण्याचा हटके अंदाज आणि चेह-यावरील हावभावांमुळे टुनटुनला आपल्या सिनेमात साईन करण्यासाठी निर्मात-दिग्दर्शक उत्सुक असायचे. आपल्या करिअरमध्ये टुनटुनने अनेक विनोदी अभिनेत्यांबरोबर काम केले.

टुनटुनचे खरे नाव उमा देवी खतरी असे होते. मात्र स्क्रिनवर ती 'टुनटुन' या नावाने प्रसिद्ध होती. टुनटुनचा जन्म 1 जानेवारी 1923 रोजी झाला होता. तर 24 नोव्हेंबर 2003 रोजी तिने या जगाचा निरोप घेतला.

टुनटुन अभिनेत्रीबरोबरच गायिकासुद्धा होती. टुनटुनचा जन्म एका रुढिवादी उत्तर भारतीय कुटुंबात झाला होता. तेरा वर्षांची असताना टुनटुनने आपल्या आईवडिलांना गमावले होते. त्यानंतर नशीब आजमावण्यासाठी टुनटुन मुंबईत दाखल झाली आणि ब्रेक मिळवण्यासाठी संगीतकार नौशाद यांच्याकडे गेली.

नौशाद यांना भेटल्यानंतर पुढे काय झाले, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...