आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'जिस्म २'च्या या अभिनेत्रीवरुन अखेर 'पडदा' हटवला !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्माती पूजा भट्टने अखेर 'जिस्म २'च्या या पोस्टवरची ही ओली चादर हटवली आहे. 'जिस्म २' या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चित्रपटाचा फर्स्ट लूक म्हणून हे पोस्टर पूजाने रिलीज केले होते. मात्र या पोस्टरमध्ये पांढ-या चादरखाली असलेली ही अभिनेत्री कोण ? हे पूजाने हुशारीने गुलदस्त्यातच ठेवले होते. 'जिस्म २' मध्ये सनी लियोन मेन लीडमध्ये असल्यामुळे या पोस्टरमधली अभिनेत्री सनीच असल्याचे आजवर सगळ्यांना वाटत होते. मात्र या पडद्यामागची कहाणी काही वेगळीच आहे. या पडद्यामागे असलेली अभिनेत्री मुळात सनी नाहीच.
पोस्टरवरील अभिनेत्री सनी नसून ‘नतालिया कौर’ ही अभिनेत्री आहे.
वर्षभरापूर्वी जेव्हा सनी लियोन 'जिस्म-२' साठी काम करण्याचे कुणाच्या डोक्यातही नव्हते तेव्हा पूजा भट्टने नतालियाकडून हे फोटोशूट करवून घेतले होते. सनीच्या आधी बिपाशा बासू किंवा मल्लिका शेरावत या चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा होती. मात्र जोपर्यत अभिनेत्रीचे नाव नक्की होत नाही, तोपर्यंत लोकांना ‘नेत्रसुख’ मिळावे यासाठी पूजाने तिच्या फार्महाऊसवर नतालिया कौरला घेऊन हे फोटोशूट करुन घेतले. पूजाने तिचा मित्र जॉय दत्ताकडून हे फोटोशूट करुन घेतले. जॉय दत्ता ब्राझिलच्या मॉडेल्सबरोबर काम करतो. त्याच मॉडेल्सपैकी नतालियाची निवड जॉयने केली.
नतालिया कौरला आपण यापूर्वी राम गोपाल वर्माच्या ‘डिपार्टमेंट’ सिनेमातील हॉट आयटम नंबरमध्ये पाहिले आहे.
PHOTOS : या अदा दाखवून सनीने दिले 'जिस्म-2' पाहण्याचे निमंत्रण
'जिस्म २'मध्ये पोर्नस्टारच्या भूमिकेत सनी
PHOTOS : 'जिस्म 2'मध्ये सनीचे पोर्न सिनेमांसारखे हॉट सीन्स !
'लहान मुलांसाठी नाही सनी लियोनचा जिस्म-2'